आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ मिळाली:ई-केवायसी पूर्ततेसाठी दिली ७ पर्यंत मुदतवाढ; अन्यथा पीएम सन्मान निधीच्या हप्त्यास मुकणार

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री (पी.एम.) किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना अनिवार्य ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत हेाती. तालुक्यात या योजनेच्या २० हजाराहून अधिक लाभार्थ्यांनी अजूनही ई-केवायसीची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यासाठी वेळ मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केले नसेल त्यांना लाभ देण्यात येणार नाही. या शेतकऱ्यांनी येत्या दाेन-तीन दिवसांत ई-केवायसीची पूर्तता करावी, असे आवाहन तहसीलदार अमाेल माेरे यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणारी महत्त्वपूर्ण योजना असून त्या अंतर्गत देशातील सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ हजाराप्रमाणे वर्षाला तीन हप्ते म्हणजेच एकूण ६ हजार रूपये प्रती वर्ष सन्मान निधी देण्यात येतो. तालुक्यात या योजनेचा ६३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळतो. मात्र अजूनही २० हजाराहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसीची पूर्तता न केल्याने त्यांना मिळणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे. अशा शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून ३१ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीनंतरही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे ७ सप्टेंबरपर्यंत केंद्र सरकारने मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांनी या मुदतीत तरी ई-केवायसीची पूर्तता करावी. अन्यथा त्यांची प्रतिवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत बंद केली जाईल. ई-केवायसीची पूर्तता न केलेल्या शेतकऱ्यांना २५ सप्टेंबर राेजी वाटप हाेणारा हप्ता वाटप हाेणार नसल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...