आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर:एरंडोलला शिबिरात 300 जणांची नेत्रतपासणी‎

एरंडोलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल‎ येथील देशमुख मढी परिसरात‎ सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने‎ नम्रता गणेश मंडळ, अनिलभाऊ‎ महाजन मित्र परिवार व कल्पना‎ हॉस्पिटलतर्फे नेत्र तपासणी व‎ मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे‎ आयोजन झाले. शिबिराचा ३००‎ रुग्णांनी लाभ घेतला.‎महात्मा ज्योतिबा फुले व‎ सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे‎ पूजन मान्यवरांनी केले.‎ अध्यक्षस्थानी निवृत्त तहसीलदार‎ अरुण माळी होते.

त्यांनी‎ सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर‎ प्रकाशझोत टाकला. त्यांनी‎ केलेल्या महान कार्यामुळे स्त्री‎ कुळाचा उद्धार झाला अाहे. आज‎ आपल्याला सर्व क्षेत्रात स्त्रियांची‎ अभूतपूर्व प्रगती होतांना दिसते,‎ असे सांगितले. सावता माळी‎ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष‎ विजय महाजन, माजी नगरसेवक‎ रुपेश माळी, अतुल महाजन यांनी‎ मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन‎ मैत्री सेवा फाउंडेशनचे पियुष‎ चौधरी यांनी केले. तर आभार‎ प्रदर्शन समता परिषदेचे शहराध्यक्ष‎ सागर महाजन यांनी मानले. अनिल‎ महाजन, डॉ.ऋषिकेश पाटील,‎ संदीप पाटील व नम्रता गणेश‎ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी‎ सहकार्य केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अनमोल सहकार्य लाभले. या‎ तपासणी शिबिराचा सुमारे तीनशे‎ अबालवृद्ध रुग्णांनी लाभ घेतला.‎ माजी जि.प. सदस्य नानाभाऊ‎ महाजन, बाजार समितीचे माजी‎ सभापती शालिग्राम गायकवाड,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ माजी उपनगराध्यक्ष संजय‎ महाजन, माजी उपनगराध्यक्ष‎ कुणाल महाजन, प्रमोद महाजन,‎ कैलास महाजन, योगराज महाजन,‎ ईश्वर पाटील, विक्रम महाजन,‎ तुळशीराम महाजन उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...