आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:शेतकरी संघटनेने कॉर्नर सभा घेत 12‎ गावातील शेतकऱ्यांमध्ये केली जागृती‎; प्रथमच घेतलेल्या अभियानाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद‎

चोपडा‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपडा‎ शेती मालाच्या भावासंदर्भात आणि‎ विविध मुद्द्यांवर शेतकरी बाजारपेठेत‎ कसा लुबाडला जातो, आपल्या‎ हक्काचे अधिकार काय आहेत, या‎ मुद्यावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती‎ व्हावी, हा प्रमुख उद्देश ठेऊन शेतकरी‎ संघटनेचे जनजागृती अभियान सुरु‎ केले आहे. शेतकरी संघटनेचे उत्तर‎ महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संदीप‎ पाटील यांनी तालुक्यातील बारा‎ गावांमध्ये प्रथमच रात्री कॉर्नर सभा‎ घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.‎ शेतकरी संघटनेने आतापर्यंत चोपडा‎ तालुक्यातील खर्डी, आडगाव,‎ सुटकार, वटार, लोणी, कुरवेल,‎ विरवाडे, वडती, नरवाडे, मंगरूळ,‎ विष्णापूर व गोरगावले अशा १२‎ गावांमध्ये शेतकरी संघटनेने कॉर्नर सभा‎ घेऊन शेतकरी जनजागृती अभियानास‎ सुरुवात केली आहे.

पहिल्या टप्प्याचे‎ अभियान २१ एप्रिलपासून सुरू आहे.‎ संदीप पाटील व त्यांचे पदाधिकारी यांनी‎ १२ गावात शेतकरी एकजूट करून त्यांना‎ आपल्या हक्काच्या मागण्यांबाबत‎ जनजागृती केली. तालुक्यात‎ शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा हा‎ पहिला प्रयोग असला तरी यात‎ शेतकऱ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला.‎ २४ पिकांना हमी भावाचे कवच‎ असतानाही ते का मिळत नाही? तसेच‎ शेतातील उभ्या उसाचे करायचे काय,‎ शेताला लागणारी वीज जोडणी सक्तीने‎ का तोडली जाते, कापूस पीक विम्याची‎ उर्वरित रक्कम द्यावी , तसेच नियमित‎ कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना‎ प्रोत्साहनपर रक्कम अजूनही मिळालेली‎ नाही, असे शेतकऱ्यांचे मुख्य मुद्दे‎ आहेत. या संदर्भात जनजागृती केली‎ जात आहे.

तर सत्ताधारी व विरोधी पक्ष‎ नको असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून‎ शेतकऱ्यांचा भ्रमनिरास करत आहेत.‎ हेच सांगण्यासाठी शेतकरी संघटना‎ गावोगाव जनजागृती करत आहे. या‎ अभियानात उत्तर महाराष्ट्र विभागीय‎ अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह उप‎ जिल्हाध्यक्ष किरण गुर्जर, तालुकाध्यक्ष‎ सचिन शिंपी, तालुका सरचिटणीस‎ विनोद धनगर यांचा सहभाग आहे.‎

बातम्या आणखी आहेत...