आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा:शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची शेतकऱ्यांशी चर्चा

पारोळा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या वेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष शशिकांत भदाणे व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष कडू पाटील तसेच पारोळा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. बैठकीला धरणगाव तालुका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष भिकनराव पाटील, पारोळा शहर युवक अध्यक्ष नीलेश चौधरी, धरणगाव तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भगवान सूर्यवंशी, भाऊराव पाटील, विश्वास पाटील, संजय पाटील, धुडकू पाटील, दीपक पाटील, मधुकर पाटील, जगदीश मनोरे, सुयोग पाटील, रघुनाथ पाटील, उमेश पाटील, हेमकांत पाटील, प्रेमराज पाटील, शांताराम पाटील, प्रदीप पाटील, समाधान पाटील आदी उपस्थित होते. शेतकरी चोहोबाजूंनी भरडला जात आहे. वीज, कापूस, कांदा प्रश्न, पिक विमा, अतिवृष्टी असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे असतात. संघटनात्मक काम करताना संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण तालुका पिंजून काढू, अशी ग्वाही ललित बहाळे यांनी या वेळी दिली. शेतकऱ्यांकडून वीज बिल मागू नये, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी या वेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...