आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळमसरा येथे घडली दुर्घटना:पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू ; गावावर शोककळा

पाचोरा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने २६ वर्षीय अविवाहित शेतकऱ्याचा मृत्यू झाला. कळमसरा (ता.पाचोरा) येथे १२ रोजी सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली. हरी राजू मोरे असे या घटनेतील मृताचे नाव आहे. शेतकरी हरी मोरे हे १२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतातील पिकास फवारणी करत होते. तहान लागल्याने ते शेतात असलेल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले.

विहिरीजवळ चिखल असल्याने पाय घसरुन ते विहिरीत पडले. ही घटना शेजारील शेतात काम करणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोरे यांना विहीरी बाहेर काढले. मात्र विहिरीत जास्त पाणी असल्याने मोरे यांचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. मोरे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. मोरे यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली. घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...