आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीचे पैसे:अमळनेरात शेतकऱ्यांना मिळणार आठवड्याभरात अतिवृष्टीचे पैसे

अमळनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी दसरा व दिवाळी हे सण लक्षात घेता शेतकरी बांधवासाठी अतिवृष्टीचे आलेले अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यावर वितरित करावे, अशा सूचना आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना केल्या आहेत.

अमळनेर मतदार संघातील पातोंडा सर्कलमधील गावांचे २०२२मधील तसेच २०१९मधील ४० गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले हाेते. हे अनुदान आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहे. केवळ तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना ते प्रत्यक्ष मिळण्यास विलंब होत आहे. मात्र. दसरा सण तोंडावर आल्याने आमदारांनी तहसीलदारांच्या अनुदान वितरणाच्या कामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांचे दसरा व दिवाळी हे सण आनंदात जाण्यासाठी या कामकाजास वेग देऊन दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कशी पडेल, अशी व्यवस्था करावी, अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या. यावर तहसीलदार वाघ यांनी याच आठवड्यात संपूर्ण अनुदान वितरण झालेले असेल, अशी ग्वाही दिली.

बातम्या आणखी आहेत...