आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदाचा कार्यभार:दूध संघाकडून शेतकऱ्यांचे नऊ कोटींचे पेमेंट थकीत ; आमदार मंगेश चव्हाण यांचे उपनिबंधकांना पत्र

चाळीसगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुध संघातील तूप अपहारप्रकरणी कार्यकारी संचालक, प्रशासन अधिकारी व इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटक झाली आहे. अशा परिस्थितीत दूध संघ प्रशासनाने कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार संघातील इतर अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक होते. दूध संघाची निवडणूक आचारसंहिता असताना सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे चेअरमन यांच्याकडे असतात. त्यांनीही याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुधाचे ९ कोटींचे पेमेंट थकले आहे. तसेच दूध संकलन व वितरण करणाऱ्या वाहनांचीही थकबाकी वाढली आहे. त्यामुळे संबंधितांना याबाबत निर्देश द्यावेत, असे पत्र आमदार मंगेश चव्हाण यांनी सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) जळगाव यांना दिले.

पत्रात नमूद केले आहे की, दुध उत्पादकांचे पेमेंट दरमहा १, ११ आणि २१ तारखेला बिलिंग सायकलमध्ये होते. तसेच दुध संकलन आणि वितरणाचे ट्रान्स्पोर्टचे पेमेंट दरमहा ८, १८, २८ तारखेलाला होणे अपेक्षित आहे. वाहनांचे पेमेंट थकीत झाल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...