आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडी:मृताच्या नावे खरेदीखत करत बळकावले शेत ; अमळनेर न्यायालयाने तिघांना सुनावली कोठडी

पारोळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्यांच्या नावाने खरेदीखत करून फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसांनी तिघांना अटक केली. सुनील ब्रिजलाल पवार (वय ६०) यांचे आजोबा स्व.रामदास पवार क्षेत्रीय (रा.नेरपाट) यांनी त्यांची नेरपाट शिवारातील गट ६३ मधील जमीन कसण्यासाठी, संशयित दत्तू दगडू पाटील यांचे आजोबा उत्तम अवचित पाटील यांना दिली होती. दरम्यान रामदास पवार क्षेत्रीय यांचे १९६७ मध्ये निधन झाले. तरी ते जिवंत असल्याचे दाखवून त्यांच्याजागी दुसऱ्या व्यक्तीला उभे करून संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच त्यांची जमीन संशयित दत्तू दगडू पाटील यांनी संशयित साक्षीदार प्रदीप सुभाष पाटील, संतोष मुरलीधर पाटील व इतर दोघांनी दत्तू दगडू पाटील (रा.रत्नापिंप्री, ता.पारोळा) यांनी नावावर करून घेतली. त्यामुळे तिघांना पोलिसांनी अटक केली. तिघांना अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...