आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:पाचोरा तहसीलसमोरील उपोषण जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्वासनाने मागे ; मात्र महिना उलटूनही चौकशी होत नाही

पाचोरा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामीण रुग्णालयात ११ मे रोजी जन्मलेल्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकाराची चौकशी करावी, या मागणीबाबत सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले. येथील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे चौकशीची मागणी केली होती. मात्र महिना उलटूनही चौकशी होत नसल्याने पाटील सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या आश्वासनानंतर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...