आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:पाचोऱ्यात महात्मा फुले यांचापुतळा उभारण्यासाठी उपोषण; मागणीसाठी ओबीसी मोर्चाचा आक्रमक पवित्रा

पाचोरा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी ओबीसी मोर्चातर्फे सुनील शिंदे, माजी नगरसेवक अशोक मोरे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे यांनी पालिकेसमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यापुर्वी १ जुनला उपोषणकर्त्यांनी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना निवेदन देवून, १५ जूनचा अल्टीमेट दिला होता. मात्र मागणी पूर्ण न झाल्याने उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा बसवण्यासाठी मागणी लावून धरली आहे. शासनाकडे प्रस्ताव दिला.

पाचोरा शहरात महात्मा ज्योतीराव फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पालिकेने शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. पुतळा बसविण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. पुतळ्याची नियोजित जागा शुशोभिकरणासाठी आमदार किशोर पाटील यांच्या फंडातून निधी मंजूर झाला आहे. याबाबत पालिकेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १७ जूनला पत्र प्राप्त झाले असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...