आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम‎:टायगर स्कूलमध्ये फादर्स डे निमित्त कार्यक्रम‎

पारोळा‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील टायगर इंटरनॅशनल‎ स्कूलमध्ये फादर्स डे मोठ्या‎ उत्साहात साजरा करण्यात आला.‎ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ‎ ‎ ग.स.संचालक विश्वास पाटील,‎ सीए मुकेश चोरडिया, प्राचार्या‎ सुरेखा पाटील, प्रमोद पाटील‎ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ‎अध्यक्षस्थानी स्कूलचे अध्यक्ष‎ रविंद्र पाटील होते. तसेच‎ कार्यक्रमात स्कूलच्या संचालिका‎ रुपाली पाटील उपस्थित होत्या.‎ प्रमुख अतिथी विश्वास पाटील यांनी‎ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले‎ की, लहानपणापासून विद्यार्थ्यांना‎ आई-वडिलांचा आणि वडिलधाऱ्या‎ व्यक्तींचा आदर करणे हे संस्कार‎ देणे खूप महत्त्वाचे आहे. मुकेश‎ चोरडिया यांनी शाळेचे कौतुक‎ करताना पहिल्यांदाच आपण फादर्स‎ डे स्कूलमध्ये साजरा होताना पाहत‎ आहोत असे सांगितले. तसेच‎ वडील हे बऱ्याच वेळा आपल्या‎ भावना व्यक्त करत नाहीत.

परंतु‎ घरातील सगळ्यांचीच जाणीव‎ त्यांना असते. अशा प्रकारच्या‎ कार्यक्रमात वडीलही आपल्या‎ भावना व्यक्त करतात तसेच प्रमुख‎ अतिथी प्रमोद पाटील सर यांनी‎ घरातील वडील आपल्या कुटुंबाची‎ कशा पद्धतीने जबाबदारी पार‎ पाडतात आणि स्वतःच्या पहिले‎ आपल्या कुटुंबाची गरज पूर्ण‎ करतात. परंतु मुलांचं आपल्या‎ वडिलांशी जे संबंध असतात ते‎ शिस्तीचे असतात. जसे आई‎ वेळोवेळी सांगत असते की हे करू‎ नको ते करू नको वडील रागावतील‎ म्हणून हे आईचं कर्तव्य आहे, की‎ त्यांनी वडिलांची सकारात्मक प्रतिमा‎ आपल्या मुलांना सांगावी. आजच्या‎ बदलत्या काळात सुशिक्षित सोबतच‎ सुसंस्कृत पिढी घडावी यासाठी‎ आपण प्रयत्न करायला हवे आणि‎ स्कूलच्या या उपक्रमाचा त्यांनी‎ अभिनंदन केलं. सूत्रसंचालन‎ शिक्षिका श्वेता भोसले यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...