आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:चाळीसगाव तालुक्यातील पंधराशे शिवभक्त होणार रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार; आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे रायगड मोहिमेचे आयोजन

चाळीसगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या राजधानीत रोवली व ते “छत्रपती’ झाले अशा किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील १५०० हून अधिक शिवप्रेमी युवक चाळीसगावातून शनिवारी सायंकाळी रवाना झाले. आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून या रायगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेचा शुभारंभ सोहळा हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडला. या वेळी भाजपसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींच्या हस्ते भगवी झेंडी दाखवून २५ विठाई बसेसचा ताफा रायगडाकडे रवाना झाला. या वेळी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह नगराध्यक्षा आशालता चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ नेते विश्वास चव्हाण, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र राठोड, उद्योजक योगेश अग्रवाल, समता सैनिक दलाचे नाना बागुल, रयत सेनेचे गणेश पवार, मराठा सेवा संघाचे सुधीर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, आगार व्यवस्थापक संदीप निकम, माजी गटनेते संजय पाटील, माजी सभापती दिनेश बोरसे, माजी नगरसेवक नितीन पाटील, आनंद खरात, सोमसिंग राजपूत, नीलेश राजपूत, प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, चिराग शेख, बापू अहिरे, मानसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे, माजी नगरसेविका संगीता गवळी, विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, रमेश सोनवणे, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, नमोताई राठोड, अमोल चव्हाण, अमोल नानकर, उद्योजक अविनाश चौधरी, भावेश कोठावदे, जितू वाघ आदी उपस्थित होते.

संकल्पात कोरोनामुळे दोन वर्ष खंड : आमदार चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा असणारी स्वाभिमानी, नितीवंत, निर्व्यसनी युवा पिढी घडवण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी २०१९मध्ये ४०० हून अधिक तरुणांना रायगड वारी घडवून आणली होती. त्यावेळी पुढील काळात दरवर्षी किमान १ हजार तरुणांच्या कपाळी रायगडाची माती लावेल, असा संकल्प केला होता. मध्यंतरी काेराेनामुळे २ वर्ष खंड पडला तरी यावर्षी शहर व तालुक्यातील १५०० तरुणांना यात सहभागी केल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...