आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी प्रकरण:चाळीसगावात हाणामारी; 9 जणांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोहरेत दारूच्या नशेत तिघांवर तलवारीने हल्ला

तालुक्यात होळीच्या सणाला हाणामारीचे गालबोट लागले. शहरात बैल बाजारात होळी पेटवण्याच्या ठिकाणी वादाची ठिणगी उडून एकाच्या नाकावर चाकू मारून दुखापत केली तर दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील पोहरे येथे होळीच्या दिवशी दारूच्या नशेत एकाने तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले. याप्रकरणी चाळीसगाव शहर व मेहुणबारे पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले.

होळीच्या दिवशी गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील आदित्य नगरामध्ये होळीनिमित्त सार्वजनिक होळी पेटवण्याच्या ठिकाणी तरुणांमध्ये वाद झाला. या वादाच्या कारणावरून शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बाजार समितीतील बैल बाजारात नऊ जणांनी गैर कायदा मंडळी जमवून विनोद देविदास राठोड (वय २७) रा. रामवाडी याच्या नाकावर चाकू मारून दुखापत केली. तर त्याचे साथीदार गौरव पांडुरंग बोराडे व ओम संजय गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी विनेाद राठोड याने दिलेल्या फिर्यादीवरून गोलू कुमावत, अक्षय साहेबराव मोरे, दोघे रा. आदित्यनगर, कनू देशमुख, छबू देशमुख, दोन्ही रा. हरीगिरीबाबा नगर व त्यांच्यासोबत इतर चार अशा नऊ जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

पोहऱ्यात दारूच्या नशेत तुषार तलवार घेऊन आला. त्याचा हात धरला असता गोकुळ माळी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला लागले. त्यावेळी गोरख माळी, पार्थ माळी व वेदांत माळी हे धावले असता त्यांना देखील लागले. यावेळी गोकुळ माळी यांनी तुषार याच्या हातातील तलवार हिसकावत मेहुणबारे पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी गोकुळ माळी यांच्या तक्रारीवरून तुषार माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...