आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी:अखेर चार वर्षांनी राष्ट्रवादीच्या जामनेर तालुकाध्यक्षांची निवड

जामनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदकासाठीच्या नावावर एकमत होत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून राजेंद्र पाटील यांच्याकडेच तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. तर तालुकाध्यक्षपदी विलास राजपूत यांची निवड व्हावी यासाठी स्थानिक नेते संजय गरूड आग्रही होते. अखेर विलास राजपूत यांची या पदावर वर्णी लागली आहे. तालुक्यात भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची गणना होते.

गेल्या काही वर्षांत पक्षात अनेक स्थित्यंतरे झालीत. अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले तर अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेशही केला. यात नव्या जुन्यांचा खेळ बघावयास मिळत होता. त्यामुळे तालुकाध्यक्ष पदाच्या नावावर एकमत होतांना दिसत नव्हते. राजेंद्र पाटील यांचा दोन वर्षांचा कालावधी संपला तरी पुढील तब्बल दोन वर्षे त्यांच्याकडेच प्रभारी म्हणून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. विशेषत: मनसे तून आलेल्या विलास राजपूत यांच्या नातवासाठी स्थानिक नेते संजय गरूड यांचा आग्रह होता. अखेर विलास राजपूत यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली.

अखेर चार वर्षांनी राष्ट्रवादीच्या जामनेर तालुकाध्यक्षांची निवडस

प्रतिनिधी | जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदकासाठीच्या नावावर एकमत होत नसल्याने गेल्या चार वर्षांपासून राजेंद्र पाटील यांच्याकडेच तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. तर तालुकाध्यक्षपदी विलास राजपूत यांची निवड व्हावी यासाठी स्थानिक नेते संजय गरूड आग्रही होते. अखेर विलास राजपूत यांची या पदावर वर्णी लागली आहे. तालुक्यात भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची गणना होते.

गेल्या काही वर्षांत पक्षात अनेक स्थित्यंतरे झालीत. अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून गेले तर अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेशही केला. यात नव्या जुन्यांचा खेळ बघावयास मिळत होता. त्यामुळे तालुकाध्यक्ष पदाच्या नावावर एकमत होतांना दिसत नव्हते. राजेंद्र पाटील यांचा दोन वर्षांचा कालावधी संपला तरी पुढील तब्बल दोन वर्षे त्यांच्याकडेच प्रभारी म्हणून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. विशेषत: मनसे तून आलेल्या विलास राजपूत यांच्या नातवासाठी स्थानिक नेते संजय गरूड यांचा आग्रह होता. अखेर विलास राजपूत यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली.

प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न
राज्याच्या राजकारणात मराठा समाजाचा पक्ष अशी काहीशी प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे बोलले जाते. जामनेर तालुक्यातही तालुकाध्यक्ष पदाची धुरा ही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर होती. केवळ मराठा समाजाचा नव्हे तर सर्वसामान्यांचा पक्ष असल्याची भावना दृढ व्हावी यासाठी गरूड यांनी अल्पसंख्यांक अशा राजपूत समाजातील व्यक्तीला तालुकाध्यक्ष पदासाठी आग्रह धरला असावा असे मत पक्ष कार्यकर्ते व्यक्त करतात.

बातम्या आणखी आहेत...