आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांनी आठ:अखेर शेंदुर्णीत व्यापाऱ्यांनी आठ तारखेपासून पुकारलेला बंद मागे

शेंदुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगरपंचायतीने केलेल्या करवाढी विराेधात शहरातील व्यापाऱ्यांनी ८ तारखेपासून शेंंदुर्णी बंदची हाक दिली हाेती. परंतु, नगरपंचायतीने करवाढ मागे घेतल्याने तूर्तास बंदची हाक शेंदुर्णीतील व्यापाऱ्यांनी मागे घेतली आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे नगरपंचायतीने वाढीव कराची आकारणी केली हाेती. त्यानुसार घरोघरी नोटीसही वाटप करण्यात आल्या हाेत्या. ही करवाढ रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांसह नागरिकांनी नगरपंचायतीवर मोर्चा काढला होता. ही करवाढ रद्द न झाल्यास आठ तारखेपासून शेंदुर्णी शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता.

दरम्यान, त्याच दिवशी नगराध्यक्ष वजिया खलसे यांनी नगरसेवकांची बैठक बोलावून त्यात वाढीव करवाढ तूर्त स्थगित ठेवण्याबाबत ठराव संमत केला. तसे व्यापाऱ्यांना-ही कळवले हाेते. त्यानुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल यांनी करवाढीचा निर्णय स्थगित ठेवल्यामुळे बंद मागे घेतल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...