आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणाची सांगता:अखेर कासोदा ग्रामपंचायत सदस्यांच्या उपोषणाची सांगता

एरंडाेल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कासोदा येथील सुमारे ११ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांची चौकशी करा, या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे उपोषण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता मनोरे आणि दळवी यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी करण्यात येईल, तसेच काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन हे उपाेषण साेडवण्यात आले.

कासोदा येथील सुमारे ११ कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ५ वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आराेप केला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य अरशद सय्यद, मुश्रीफ पठाण व त्यांचे सहकारी डॉ. नाजीम शेख व ग्रामस्थांनी चार दिवसांपासून तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. या योजनेच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची सूचना आमदारांनी केली. या वेळी शालिग्राम गायकवाड, आनंदा चौधरी, राजेंद्र चौधरी, नंदू मोहिते, अहेसान अली सय्यद, डॉ. नाजीम अली सय्यद, बापू शिरसाठ, आसिफ मण्यार, माजी नगरसेवक अस्लम पिंजारी, आरिफ शेख, नायब तहसीलदार दिलीप पाटील हजर हाेते.

बातम्या आणखी आहेत...