आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:शेंदुर्णीत रात्री 10 वाजता आग; गोदामात ठेवलेली ढेप, कापसाच्या गाठी खाक

शेंदुर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील सहकारी खरेदी-विक्री संघाच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या गोदामाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या ढेपसह कापसाच्या गाठी व इतर साहित्य व यंत्र जळून खाक झाल्याची घटना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. सहकारी संस्थेचे गोदाम पवन राजमल अग्रवाल व राजमल अग्रवाल यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले आहे. याच गोदामात कापसाच्या गाठीसुद्धा दुसऱ्या व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या होत्या.

त्याही जळून भस्मसात झाल्या आहेत. आगीच्या रौद्र रूपामुळे संपूर्ण इमारतीसह पत्रे, इलेक्ट्रिक फिटिंग व इतर साहित्य जळाले. या वेळी गोपाला जिनिंग व राजमल अग्रवाल फर्म व नगरपंचायतीच्या टँकरने आग विझवण्यासाठी मदत केली. तासाभराने पाचोरा अग्निशामक दलाचे वाहन पोहोचले होते.

बातम्या आणखी आहेत...