आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद:उडणी येथे शॉर्टसर्किटने आग; संसाराेपयाेगी साहित्य खाक

पारोळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उडणी दिगर येथे शॉटसर्कीटमुळे लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कम जळाल्याने जवळपास लाखाे रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ३ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

उडणी दिगर येथील रहिवासी अशोक भगवान पाटील हे ३ रोजी पत्नी, मुलगा, सुन यांच्यासह गावातीलच नातेवाईक असलेल्या निंबा त्र्यंबक पाटील यांच्या घरी देवीच्या पूजेसाठी घराला कुलुप लावून गेले होते. या वेळी घरात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घरातील साहित्याला आग लागली. दरम्यान, नागरिकांना घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली. तोपर्यंत या आगीत घरातील फ्रिज, इन्वर्टर, पंखा, टीव्ही, घरात ठेवलेले जवळपास २० हजार रूपयांची रोख रक्कम त्याचप्रमाणे इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले हाेते. यामुळे अशाेक पाटील यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. याबाबत अशोक पाटील यांच्या माहितीवरून पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...