आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रौद्ररूप धारण:पाचोऱ्यात दुकानाला आग; फर्निचर, कापड जळून खाक

पाचोराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बस स्थानक मार्गावरील मुद्रा एन. एक्स या रेडिमेड कापड दुकानास ६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचरसह सुमारे ६० लाखांचे कापड जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले. शिवाजी नगरमधील राहुल मोरे यांचे गणेश प्लाझा शाॅपिंग सेंटरमधील दुकान क्रमांक पाचमध्ये मुद्रा एन.एक्स हे कापड दुकान आहे. दिवाळीनिमित्त त्यांनी दुकानात विविध रेडिमेड कापड भरुन ठेवले होती. दरम्यान ५ नोव्हेंबरला राहुल मोरे यांना खासगी काम असल्याने कामगारांनी रात्री दुकान बंद केले. ६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक दुकानास आग लागल्याचे तेथून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकास निदर्शनास आले.

रुग्णवाहिका चालकाने तत्काळ राहुल मोरे यांना भ्रमणध्वनीद्वारे याची कल्पना दिली. त्यानंतर राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाचोरा पालिकेच्या अग्निशमन दलास ही माहिती दिली. मात्र, अग्निशमन दलास घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने आगीने रौद्ररूप धारण करुन संपूर्ण दुकानास वेढा घातला. उपस्थितांनी पाणी आणत आग विझवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी भडगाव पालिका व त्यानंतर पाचोरा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण दुकानातील फर्निचरसह कापड जळून खाक झाले होते. या आगीत मोरे यांचे सुमारे ६० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...