आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायदा:जिल्ह्यातील पहिलाच प्रयत्न; पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाचा फायदा

पाडळसरे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बळीराजा आता फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येत आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून आधी श्रमदानातून शेत-शिवारात पाणी जिरवले. तर आता शेतशिवार फुलवायचंय म्हणून पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने कंबर कसून कामाला लागला आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणून अमळनेर तालुक्यातील १५ गावांमधील २८ गटातील ६७५ शेतकऱ्यांनी पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी होत १ हजार १३२ हेक्टर क्षेत्राची स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकरी गट कामाला लागले असून प्रशिक्षण घेतलेल्या डांगर बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी जय योगेश्वर गटाच्या माध्यमातून कापूस बियाण्याच्या ४९२ बॅग जिल्ह्यातील मुख्य वितरकांकडून महाराष्ट्र शासनाच्या ‘एक पीक, एक वाण’ या योजनेसाठी खरेदी केल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे ४७ हजार रुपये वाचले आहेत.

जिल्ह्यातील मुख्य वितरकाने ८१० रुपये किंमत असलेली १ बॅगेची ७३० रुपयाप्रमाणे आकारणी केली. ९२ बॅगेत प्रति बॅग ८० रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांचे ७ हजार ३६० रुपये वाचले आहे. या बचतीचे गणित लक्षात घेऊन गटातील व गावातील उर्वरित शेतकऱ्यांना योजनेचे महत्त्व लक्षात आले आहे. हे शेतकरी आता फार्मर कप स्पर्धेतील गटात सहभागी होत आहेत. एकत्रित कापूस वाणाची १०० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ७५० रुपये प्रति बॅग मिळणारी बॅग ६५० रुपयाप्रमाणे खरेदी केली. यात ४०० बॅग खरेदीत एकरकमी ४० हजार रुपये वाचवले आहेत. अशा पद्धतीने फार्मर कप स्पर्धेतील डांगर बुद्रुकच्या जय योगेश्वर शेतकरी गटाने १०० शेतकऱ्यांना एकत्र आणून ४७ हजार ३६० रुपये वाचवले. पाणी फाउंडेशनच्या ज्ञानातून हा वेगळा इतिहास घडविला आहे. दरम्यान, जय योगेश्वर शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित बियाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गटातील निमंत्रक शेतकरी पवन नेरकर, सतिलाल पाटील, देवदिास पाटील यांनी शेतकऱ्यांना महत्व पटवून दिले.

जामनेर अन‌् अमळनेरचा फार्मर कप स्पर्धेत सहभाग
राज्यातील १८ जिल्ह्यातील ३९ तालुक्यामधून ३१ मे अखेरीस १६०० शे-पेक्षा जास्त शेतकरी गट स्थापन झाले. विविध ३६ पिकांचे ज्ञान तज्ज्ञ शेतकरी व कृषी वदि्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी पाणी फाउंडेशनच्या टीमच्या विविध कार्यशाळेत शेतकरी बांधवांना दिले. शेतीच्या पूर्व मशागतीपासून तर पीक काढून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्याचे ज्ञान दिले. यात अमळनेर तालुक्यातील १५ गावात २८ गट स्थापन झाले. त्यात ६७५ शेतकरी व १ हजार १३२ एकर क्षेत्र स्पर्धेत निवडले आहे. तर जामनेर तालुक्यात २० गावांमध्ये २७ गट स्थापन करून ६८० शेतकरी व १ हजार २८६ एकर जमीन फार्मर कप स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी निवडली आहे.

असे मिळेल बक्षीस
तालुका पातळीवर पहिल्या येणाऱ्या शेतकरी गटास १ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर राज्य पातळीवर प्रथम येणाऱ्या गटास २५ लाख, द्वितीय पारितोषिक १५ लाख तर तृतीय पारितोषिक १० लाखांचे असेल. यात वॉटर कप स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील अनोरे गावाची राज्य पातळीवर निवड झाली होती. त्यामुळे फार्मर कप स्पर्धेतही तालुक्यातील गट राज्यपातळीवर पोहोचेल, अशी शेतकरी गटांना अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...