आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रधानमंत्री आवास योजनेत अमळनेर नगरपरिषदेने नाशिक विभागात पहिला क्रमांक मिळवला. नाशिक विभागात ५८ नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक वैयक्तिक घरकुले पूर्ण करणारी अमळनेर नगरपरिषद प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमळनेर नगरपरिषद कार्यक्षेत्रात एकूण ७६० घरकुलांना मंजूरी मिळाली असून, त्यापैकी ५८९ लाभार्थ्यांना पालिकेकडून बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. यातील ४८६ घरकुलांचे काम सुरू झाले असून ३१७ घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. बांधकाम सुरू असलेल्या उर्वरित घरकुलांचे कामे प्रगतीपथावर आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या प्रभावी अंबलबजावणीसाठी पात्र लाभार्थ्यांचा वेळोवेळी मेळावा घेण्यात येतो. तसेच बांधकाम परवानगी मंजुरी सात दिवसात देण्यासाठी प्रयत्न केले जातात, असे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सांगितले. नगरअभियंता अमोल भामरे व उपनगर अभियंता डी. एस. वाघ, रचना सहाय्यक विकास बिरारी पाठपुरावा करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.