आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:मृत शिक्षकाच्या कुटुंबालासाडेपाच लाखांची मदत

अमळनेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सरस्वती विद्या मंदिरातील शिक्षक परशुराम गांगुर्डे यांच्या अकस्मात मृत्युपश्चात, त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. या काळात संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांनी गांगुर्डे कुटुंबियांना भक्कम आधार दिला. गांगुर्डे परिवारातील मुलींच्या शिक्षणासाठी गुरुवारी (दि.२४) साडेपाच लाखांची मदत देऊन सर्वांनी आदर्श निर्माण केला.

शिक्षक परशुराम गांगुर्डे यांचा बुधवारी (दि.२३) रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा नवा पायंडा श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ,अमळनेर, समता युवक कल्याण केंद्र, खान्देश कन्या स्व. स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, शिरपूर यांच्यातर्फे अध्यक्ष अशोक पाटील, संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक रणजित शिंदे, व शिक्षकांनी पाडला. याप्रसंगी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, जितेंद्र ठाकूर, प्रा.लिलाधर पाटील, किसन पाटील, संस्थेचे संचालक समाधान शेलार, विश्वास पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...