आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोकड खाक:आडगावला आगीत पाच जनावरे ठार; 20 कोंबड्यांसह 60 हजारांची रोकड खाक

आडगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लॉट एरियातील सांबा धना बारेला यांच्या घराला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. आगीत संसारोपयोगी साहित्य, धान्य, शिलाई मशीन, टीव्ही, दुचाकी असे साहित्य जळाले. तसेच पाच गुरे, २० कोंबड्यांचा कोळसा झाला. घरातील ६० हजार रुपयांची रोकडही जळाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

सुदैवाने घरात तीन बालकांना नागरिकांनी वेळीच बाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. बाहेर ठेवलेला ४० ते ४५ हजारांचा चारा जळून गेला. साहेबराव हिरामण पाटील, शिवराम खंडू महाजन, शिवाजी लूकडू महाजन यांच्या गोठ्यालाही आग लागून चारा आणि २० ते २५ पत्रे आगीत खाक झाले आहेत. घटनेचा पंचनामा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...