आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वास कोंडला:कन्नड घाटात एकाच वेळी पाच ट्रक फेल; तब्बल आठ तास रहदारी ठप्प; सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी

चाळीसगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड घाटात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वाहतूक ठप्प होत आहे. सोमवारी पहाटेदेखील घाटात तब्बल पाच ट्रक फेल झाल्याने, दुपारी ३ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ओव्हरलोड ट्रक घाटात नादुरुस्त होतात. त्यामुळे घाटात वाहतूक कोंडी होते.

कन्नड घाटातून दररोज जवळपास १२ हजारांपेक्षा अधिक लहानमोठी वाहने धावतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून घाटात वारंवार वाहतूक कोंडी होते. दुरुस्तीनंतर गेल्या चार महिन्यांपासून कन्नड घाटातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वीही घाटातील वाहतूक ठप्प झाली होती.

पुन्हा सोमवारी पहाटे घाटातील वरचा व खालचा यु टर्न तसेच म्हसोबा पॉईंट, महादेव मंदिर व सरदार पॉईंटजवळ अशा पाच ठिकाणी अवजड ट्रक भर रस्त्यात नादुरुस्त झाले. त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली. अडकून पडलेली वाहने मागे-पुढे होत नसल्याने दोन्ही बाजून लांबच लांब रांगा लागल्या होत्या.