आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनलचा झेंडा:तळेगाव ग्रामपंचायतीवर सर्व जागा जिंकत ग्रामविकास पॅनलचा झेंडा

चाळीसगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अंबेहोळ ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत जनता परिवर्तन पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले अाहेत. येथे १० जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात हाेते. त्यात जनता परिवर्तन पॅनलच्या संजूबाई कैलास चव्हाण (बिनविरोध), अविनाश शशिलाल जाधव, प्रदीप आभानसिंग राठोड, अनुसयाबाई ओंकार वंजारी, वैशाली संदीप राठोड, संगीता सुदाम वंजारी, वासुदेव जगन चव्हाण, दिलीप दावल चव्हाण हे उमेदवार विजयी झाले अाहेत. जनता परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी भरत चव्हाण, कांतिलाल राठोड, डॉ. संदीप राठोड, बद्री सोनार, अॅड. भरत चव्हाण, श्रावण राठोड, धनराज चव्हाण यांनी सहकार्य केले.

अंबेहाेळ ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलचे वर्चस्व
तालुक्यातील अंबेहोळ ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या तिरंगी लढतीत जनता परिवर्तन पॅनलचे ८ उमेदवार विजयी झाले ऐहेत. येथे १० जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात हाेते. त्यात जनता परिवर्तन पॅनलच्या संजूबाई कैलास चव्हाण (बिनविरोध), अविनाश शशिलाल जाधव, प्रदीप आभानसिंग राठोड, अनुसयाबाई ओंकार वंजारी, वैशाली संदीप राठोड, संगीता सुदाम वंजारी, वासुदेव जगन चव्हाण, दिलीप दावल चव्हाण हे उमेदवार विजयी झाले आहेत. जनता परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी भरत चव्हाण, कांतिलाल राठोड, डॉ. संदीप राठोड, बद्री सोनार, अॅड. भरत चव्हाण, श्रावण राठोड, धनराज चव्हाण यांनी सहकार्य केले.

निकाल ऐकण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी
तळेगावसह कृष्णनगर, आंबेहोळ, सुंदरनगर व चिंचगव्हाण येथे ४ ऑगस्टला मतदान झाले होते. शुक्रवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, मुबारक पठाण आदींसह निवडणूक विभागातील कर्मचारी यांनी यासाठी सहकार्य केले. निकालाची उमेदवार व त्याच्या समर्थकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे सकाळपासूनच निकाल एेकण्यासाठी तहसील कार्यालयात उमेदवार व समर्थकांनी गर्दी केली हाेती. तर निकाल जाहिर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

बातम्या आणखी आहेत...