आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:पारोळ्यात रथ गल्लीत पूर, रविवारी दोन तास पावसाची हजेरी

पारोळा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी शहरासह तालुक्यात दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन दास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. पावसामुळे शहरातील रथ गल्लीत पूर आला होता. तर ग्रामीण भागात म्हसवे, हिरापूर, धाबे, दगडी सबगव्हाण, शेवगे, कन्हेरे, पळासखेडे, लोणी परिसरात उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता.

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की शहरातील सर्वात मोठ्या रथ गल्लीत पूर येतो. यात आझाद चौक ते रथ चौक अशा एक किमी अंतरात सर्व गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे परि,रातील नागरिकांचे ओटे पुराच्या पाण्यात बुडतात. अनेकदा दुचाकी वाहने वाहून जातात.

बातम्या आणखी आहेत...