आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:धरणगाव येथे पोलिसांच्या रुटमार्चवर केली पुष्पवृष्टी

धरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आज धरणगाव पोलिस आणि रॅपीड अॅक्शन फोर्सने शहरातून रूट मार्च काढला हाेता. शहरातील मुख्य रस्त्यावरुन हा रुट मार्च काढण्यात आला.

पोलिस ठाण्यापासून सुरू झालेला रूट मार्च व्हाईट हाऊस, धरणी, शास्त्री पुतळा आणि त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर फॉलिंग करण्यात आली. या वेळी रॅपीड अॅक्शन फोर्सचे उप कमांडट शशिकांत राय, सह कमांडट संतोष यादव, पोलिस निरीक्षक जी. एस. झारिया, पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रुट मार्चमध्ये आरएएफचे ९० जवान, २० पोलिस अंमलदार, २० होमगार्ड आदींनी सहभाग नोंदवला. रुट मार्च वेदांत डेंटल हॉस्पिटलजवळ आल्यानंतर डॉ. सचिन पेंढारे यांच्यासह सुनील चौधरी यांनी जवानांवर फुलांचा वर्षाव केला, तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...