आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाडगावात श्रमदान:कृषी अधिकाऱ्यांनी‎ बांधला वनराई बंधारा‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ‎ तालुक्यातील जाडगाव येथील पाणी‎ वाहत असलेल्या नाल्यावर कृषी‎ विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी‎ स्वतः श्रमदानातून वनराई बंधारा‎ साकारला आहे. वनराई बंधाऱ्यामुळे‎ साचलेल्या पाण्याचा उपयोग गुरांना‎ पाणी पिण्यासाठी होत आहे.

तसेच‎ जलसंधारणामुळे शेतातील‎ विहिरींना पाण्याची पातळी‎ वाढण्यास मदत होणार आहे.‎ भुसावळ तालुक्यातील अनेक‎ ठिकाणी असे वनराई बंधारे बांधले‎ आहे. तसेच जे नाले पाण्याने वाहत‎ आहेत, अशा नाल्यांवर सुद्धा वनराई‎ बंधारे बांधले जाणार असल्याचे‎ कृषी अधिकारी दिलीप चाैधरी यांनी‎ सांगितले. कृषी विभागाने‎ राबवलेल्या या उपक्रमाचे‎ परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी‎ स्वागत केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...