आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

वरणगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरणगाव शहरासाठी २५ कोटींची पाणीपुरवठा योजना भाजपच्या कार्यकाळात मंजूर झाली होती. मात्र, मुदत संपूनही योजनेचे काम अद्यापही रखडलेलेच आहे. त्यामुळे या योजनेला कार्यान्वित करून भूमिगत गटारींसह विविध कामांना निधी द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

२५ कोटींची पाणीपुरवठा योजना अंदाजित रकमेपेक्षा जास्त दराने निविदा असल्याने रद्द करण्यात आली. यानंतर कमी दराने कंत्राटदाराने योजनेचे काम घेतल्यामुळे पालिकेचे दोन कोटी रुपये वाचणार होते. योजनेचा कार्यारंभ आदेश तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. परंतु योजना परवडत नसल्याने संबंधित ठेकेदाराने आतापर्यंत वीस ते पंचवीस टक्के काम पूर्ण केले आहे.

याबाबत वेळोवेळी पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावून, जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कंत्राटदाराला समज दिली. तरीही योजनेला गती मिळालेली नाही. आता शिंदे सरकारच्या माध्यमातून योजनेला गती मिळावी, माजी नगराध्यक्ष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नागेश्वर महादेव मंदिराच्या तीर्थक्षेत्र पर्यटनाला निधी, भोगावती नदी सुशोभिकरणाच्या रखडलेल्या कामाला निधी द्यावा, भूमिगत गटारी कराव्या, अशी मागणी केली. वरणगाव शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यंत्र्यांसोबत चर्चा केली. तसेच मागणीचे निवेदन दिले. मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून वरणगावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...