आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या आठवणींना उजाळा:40 वर्षांनी एकत्र आले धरणगावचे माजी विद्यार्थी

धरणगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कला वाणिज्य महाविद्यालयात शिकणारे १९८१ ते १९८३ या काळातील विद्यार्थी एकत्र आले व त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे येथून मित्र, मैत्रिणी आले. मेळाव्यात सर्वांनी स्वपरिचय, कौटुंबीक माहिती व जुन्या आठवणींना उजाळा दिला, गाणे सादर करत आनंद लुटला.

प्रा.आर. एन. महाजन, अजय डहाळे, गुरुजनांचा व विशेष अतिथी अजय पगारिया, अॅड. मोहन शुक्ला यांच्या सन्मान करण्यात आला. डी. जी. पाटील, सुभाष देवराम पाटील हे सुद्धा उपस्थित होते. रत्ना भाटिया, विना जोशी, ज्योती असर, मीना सिसोदिया, लता वाणी, दीपक उपासनी, शेखर शुक्ल, श्रीपाद तळवेलकर, मानसिंग पाटील, प्रकाश भाटिया, जगदीश मालू, श्रीराम भोई, विलास करवा, रतन खत्री, रवींद्र रावतोळे, खेमचंद्र नेमाडे, दिलीप बडगुजर, रवींद्र फुलपगार, नितीन गुजराथी, राजेश शहा आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...