आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहतुकीचा परवाना नसताना अवैधरीत्या मालवाहू पिकअप गाडीतून वाहतूक करणाऱ्या चार गाई सुटका करण्यात आली. हा प्रकार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही गाईंना गो शाळेत पाठवण्यात आले आहे.
या संदर्भात पाेलिस काॅन्स्टेबल स्वप्नील चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २८ रोजी सायंकाळी भडगाव ते पारोळा रोडवरील हलवया नाल्याजवळ पांढऱ्या रंगाची मालवाहू पिकअप (एमएच- १९, बीएम- ०१७८)मधून १ लाख ९० हजार रुपये किमतीच्या चार गाई वाहतुकीचा परवाना नसताना अवैधरीत्या निर्दयतेने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत हाेत्या. या प्रकरणी पाेलिस काॅन्स्टेबल स्वप्नील चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिस ठाण्यात गाडी चालक अनिस खान वजीर पठाण (रा. अंतुर्ली, ता. पाचोरा) शेख रशीद शेख करीम (रा. कबिबगंज, धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस हेड काॅन्स्टेबल विजय जाधव करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.