आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीत चार घरे खाक:तळेगाव येथे शॉर्टसर्किटमुळे आगीत चार घरे खाक

तळेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शॉर्टसर्किटमुळे तळेगाव येथील चार घरांना आग लागल्याची घटना ४ रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. सोमवारी सकाळी सुभाष लक्ष्मण चांदेकर हे धार्मिक कार्यक्रमानिमित्त बहिरोबा देवस्थानाजवळ गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते.

त्याचवेळी त्यांच्या घराजवळ असलेल्या विजेच्या वायरमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने घराला आग लागली. कैलास कोळी, अरुण कोळी, सागर वंजारी, कृष्णा कोळी, उमेश माळी, सतीश माळी, सुरेश कोळी यांनी जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवले. माजी सरपंच चत्तर सपकाळ यांनी आपले टँकर घटनास्थळी आणून पाण्याचा मारा केला. तोपर्यंत आगग्रस्त घराशेजारील डॉ. गजानन जाधव, विश्वनाथ जाधव, मथुराबाई कोळी यांच्या घरांना आगीने कवेत घेतले.

आगग्रस्त घरांमधील रहिवाशांना ग्रामस्थांनी त्वरीत बाहेर काढले. तसेच या घरांमधील सिलिंडर व अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी नेल्यामुळे अनर्थ टळला. आगीत चांदेकर यांच्या घरातील सर्व साहित्य, किरकोळ रोकड जळून खाक झाली, तर अन्य तीन घरांच्या भींतींना तडे गेले. दरम्यान, आमदार गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...