आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:योग प्रशिक्षणाच्या नावाखाली वृद्धाची सव्वा लाखात फसवणूक

धरणगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकवर पतंजली योग प्रशिक्षणाची बनावट जाहिरात टाकून त्या जाहिरातीच्या माध्यमातून धरणगावच्या वृद्धाची १ लाख १९ हजारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात दोन अज्ञात मोबाइलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.शहरातील हेमबिंदू नगरातील किशोर मंगेश पाटील (वय ६०) यांना ७ ऑगस्टला मोबाइल ९४३३२ ७३०७२ व ९७४८० ६७०६९ या क्रमांकाच्या फेसबुकवर पतंजली योगपीठ ट्रस्ट युनिट-२ हरिद्वार (उत्तराखंड) या संस्थेला योगासन आणि प्राणायामासाठी ७ दिवसांच्या प्रशिक्षणाबाबत टाकलेली जाहिरात दिसली.

या जाहिरातीत प्रशिक्षणासाठी पतंजली योगपीठ ट्रस्ट युनिट २ खात्याचा १९०५१९०१९००५९६६५ हा क्रमांक टाकलेला होता.

किशोर पाटील हे प्रशिक्षण करण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी फोन-पे याद्वारे टप्प्याटप्प्याने १ लाख १९ हजार रुपये ७ ऑगस्टला दुपारी १.५९ वाजता तसेच ८ डिसेंबर रोजी दुपारी २.२७ वाजेदरम्यान टाकले. परंतु, याबाबत संपर्क साधल्यावर पैसे परत करण्यास टाळाटाळ हाेवू लागली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर किशोर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन धरणगाव पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...