आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली:कर्ज मंजुरीच्या बहाण्याने‎ फसवणूक, संशयित अटकेत‎

पारोळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा बँकेत अधिकारी असल्याची ‎बतावणी करून, तालुक्यातील‎ शिवरे येथील महिलांना चार‎ लाखांचे कर्ज देण्याच्या बहाण्याने, ‎ ‎ संशयिताने ५ हजार ९५० रुपये आणि ‎ ‎ कागदपत्रे घेऊन फसवणूक केली‎ होती. याप्रकरणी संशयित सुनील ‎ ‎ सुकलाल ठाकरे (वय ४२,‎ रा.वडगाव, ता.जामनेर) याला‎ पोलिसांनी अटक केली.‎ संशयिताला न्यायालयाने दोन‎ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.‎ कर्ज देण्याच्या बहाण्याने बचत‎ गटातील १० महिलांचे आधार कार्ड,‎ मतदान कार्ड, बँकेचे पासबुक अशी‎ कागदपत्र जमा करून, संशयिताने‎ रजिस्ट्रेशन चार्ज, विमा अशी कारणे‎ सांगून एकूण ५९५० रुपये जमा केले‎ होते. पैसे घेतल्यानंतर संशयित‎ पसार झाला होता.

बचत गटातील‎ महिलांना संशय आल्याने, प्रतिभा‎ संजय शिकारे, शीतल समाधान‎ शेळके, रत्नाबाई सुभाष पाटील,‎ सुरेखा कैलास पाटील, उषा नंदराम‎ पाटील, भागाबाई वसंत पाटील,‎ कमलाबाई युवराज पाटील, शानुबाई‎ भीमराव पाटील, साक्षी राजू शर्मा‎ यांनी पारोळ पोलिस ठाणे गाठून‎ माहिती दिली. तसेच रुपाली पाटील‎ यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा‎ गुन्हा दाखल करण्यात आला होता.‎ पोलिस नाईक संदीप सातपुते,‎ किशोर भोई, अभिजित पाटील,‎ राहुल कोळी यांनी नरडाणा येथून‎ संशयिताला ताब्यात घेतले.‎रक्कम काढून दिली‎ संशयित सुरुवातीला उडवाउडवीची‎ उत्तरे देत होता. नंतर सखोल‎ विचारपूस केली असतान त्याने नाव‎ सांगत, गुन्ह्यातील रक्कम काढून‎ दिली. प्रदीप पाटील पुढील तपास‎ करत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...