आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांसाठी ठाकरे गटाने राबवला उपक्रम‎:पाचोरा येथे मोफत‎ मोतीबिंदू शस्त्रक्रिया‎

पाचोरा‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे औचित्य‎ साधून, उद्धव बाळासाहेब ठाकरे‎ गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी‎ परिसरातील नागरिकांसाठी, छत्रपती‎ शिवाजी महाराज चौकाजवळ‎ असलेल्या शिवतिर्थ कार्यालयात,‎ मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया‎ शिबिराचे आयोजन केले.‎ या शिबिराचे उद्घाटन वैशाली‎ सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले.‎ याप्रसंगी शेतकरी सेनेचे‎ जिल्हाप्रमुख अरुण पाटील, माजी‎ जि. प. सदस्य उद्धव मराठे, तालुका‎ प्रमुख रमेश बाफना, युवासेना‎ उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, संतोश‎ पाटील उपस्थित होते. शिबिर‎ यशस्वीतेसाठी उद्धव बाळासाहेब‎ ठाकरे शिवसेना, युवासेना, महिला‎ आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते‎ परिश्रम घेत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...