आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:विप्रो अन‌्आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे ५ हजार मुलांची मोफत नेत्र तपासणी

अमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विप्रो कंझ्युमर्स केअर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे तालुक्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देवून उपचार सुरू केले आहेत.अमळनेर तालुक्यातील पिळोदा, अंतुर्ली, रंजाणे, धार, मालपूर, अमळगाव, पिंपरी, पिंगळवाडे, चिमनपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक, मंगरूळ, दहिवद, सारबेटे, फापोरे, गडखांब, पातोंडा, जानवे, रणाईचे, मारवड, लोंढवे या गावांमधील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांच्या नेत्र तपासणी केली आहे.

विप्रोचे जनरल मॅनेजर विजय बागनिलेवाले, वेल्फेअर ऑफिसर सुधीर बडगुजर, स्टोअर परचेस मॅनेजर मिलिंद मरकंडे, अकाउंट मॅनेजर आनंद निकम, डॉ. पंकज पाटील, आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद, दीप्ती गायकवाड, मोहिनी पाटील, निकिता पाटील, नंदिनी मैराळे, मयूर गायकवाड, जितेंद्र पाटील आदींनी ५ हजार मुलांची मोफत तपासणी करून दृष्टी दोष असणाऱ्यांवर उपचार करुन माेफत चष्मा वाटप केले. दरम्यान, मंगरुळ येथे किमान १ हजार मुलांना चष्मा वाटप करुन नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल मुठे यांनी उपचार केले. या मोहिमेबद्दल माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष आर. जे. पाटील, टीडीएफचे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, तुषार बोरसे आदींनी विप्रो व आधार संस्थेचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...