आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चष्मे‎ वाटप केले.‎:पारोळ्यात 48 जणांना मोफत चष्मे‎

पारोळा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा‎ येथील मनोज जगदाळे यांनी‎ सामाजिक बांधिलकीतून मोफत नेत्र‎ तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया‎ शिबिर घेतले. त्याच्या दुसऱ्या‎ टप्प्यात‎ नेत्र तपासणी शिबिरातील‎ सहभागी नागरिकांना मोफत चष्मे‎ वाटप करण्यात आले.‎ दि.२० रोजी माजी नगरसेविका‎ पल्लवी जगदाळे यांच्याहस्ते‎ प्रभागातील ४८ जणांना मोफत चष्मे‎ वाटप करण्यात आले. यावेळी‎ सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे‎ सहकार्य लाभले. अध्यक्ष संजय‎ पाटील यांनी प्रभागातील महिला व‎ पुरुषांना चष्मे करून आरोग्याबाबत‎ काळजी घेण्याचे आवाहन केले.

या‎ मोफत चष्मेवाटप प्रसंगी सतीश‎ वाघ, गजेंद्र कुलकर्णी, अमोल‎ जगदाळे, अशोक जगदाळे,‎ खटाबाई महाजन, हिराबाई महाजन,‎ सुनंदाबाई महाजन, पल्लवी शेंडे,‎ अलकाबाई पाटील, दगूबाई पाटील,‎ अशोक शिंपी, सायरा बी उपस्थित‎ होते. प्रभागातील अनेक गरजू‎ नागरिकांना या उपक्रमाचा लाभ‎ मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून‎ दृष्टीचा त्रास सोसणाऱ्या ज्येष्ठ‎ नागरिकांनादेखील यामुळे मदत‎ मिळाली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...