आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बांबरूड (राणीचे) येथे उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे हृदयरोग तसेच न्यू माऊली नेत्रालयातर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. शिबिराचे उद्घाटन पीटीसीचे चेअरमन संजय वाघ यांनी केले. या वेळी स्थानिक चेअरमन दगाजी वाघ, नगरसेवक सनी वाघ, उद्योजक सूरज वाघ, हारून देशमुख, सरपंच अस्ताना तडवी, उपसरपंच मनोज वाघ, प्रदीप वाघ, अनिल वाघ, गुलाब तडवी, संदीप दरकोंडे, अशोक दरकोंडे, जगदीश वाघ, प्रकाश देसाई, बुऱ्हाण तडवी, सीताराम दरकोंडे, कलेखा मेवती, मधु कोकणे, तुकाराम काळे, भागवत गरुड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अभिषेक चोपकर, डॉ. यश पाटील, डॉ. जयेश जोशी, डिंपल पाटील, कुंदन बेंडाळे, सागर पवार तर माऊली नेत्रालयाचे डॉ. प्रदीप धेंडे, गोपाल नाईक, संदीप राठोड यांनी रुग्णांची तपासणी केली. नेत्र तपासणीनंतर मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले. या वेळी गटनेते ललित वाघ यांचा विविध संस्था, राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयात, जिल्हा परिषदेची शाळा, विकास सोसायटीच्या वतीने वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गजानन वाघ, पुरुषोत्तम वाघ, राहुल वाघ, विवेक जावळे, आरोग्य सेविका, आशा सेविका यांनी सहकार्य केले. रात्री ८ वाजता राममनोहर लोहिया माध्यमिक विद्यालयात आयतं पोयतं सख्याचे हे प्रवीण माळी यांचे समाज प्रबोधनपर अहिराणी एकपात्री नाटक आयाेजित केले हाेते. बांबरूड पंचायत समितीचे गटनेते तथा माजी सरपंच ललित वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.