आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियतन घटवले:गरीब कल्याण योजनेतर्गत रेशनच्या मोफत दोन किलो गव्हाला कात्री च जिल्ह्याचे 55 हजार क्विंटलवर गव्हाचे नियतन कमी

चाळीसगाव-जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात सर्वसामान्यांनी परवड होवू नये म्हणून रेशन कार्डधारकांना नियमित धान्याव्यतिरिक्त प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत ५ किलो मोफत धान्य दिले जात आहे. मात्र, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे देशात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या योजनेतर्गत राज्याला देण्यात येणाऱ्या गव्हाच्या नियतनाला कात्री लावली आहे. सर्वसामान्यांना आधार असलेला रेशनचा मोफत गहू तीनऐवजी एकच किलो मिळेल. त्याऐवजी चार किलो तांदूळ मिळणार आहे. सरकारने जिल्ह्याचे गव्हाचे नियतन ५५ हजार क्विंटलवर घटवले. त्याएवेजी तांदूळाचे नियतन ५६ हजार क्विंटलने वाढवले आहे.

गव्हाऐवजी तांदूळ वाढवला ^जळगाव जिल्ह्याला प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतर्गत ८४ हजार ७५ क्विंटल गव्हाचे तर तांदळाचे ५६ हजार ४८ क्विंटलचे नियतन मिळत होते. केंद्र शासनाने गव्हाचे नियतन घटवल्यामुळे २८ हजार २० क्विंटल गहू तर १ लाख १२ हजार क्विंटल तांदळाचे नियतन देण्यात आले आहे. गव्हाचे नियतन ५५ हजार ९५ क्विंटलने घटवण्यात आले तर तांदळाचे नियतन ५६ हजार क्विंटलवर वाढवले आहे. त्यामुळे आता तीन ऐवजी एकच किलो गहू लाभार्थ्यांना मिळेल. त्याऐवजी तांदळामध्ये वाढ केली आहे. आता लाभार्थ्यांना दोन ऐवजी चार किलो तांदूळ मिळेल. प्रशांत कुलकर्णी,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी

नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार प्राधान्य कुटुंबांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जात होते. त्याऐवजी आता एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ‘अंत्योदय’साठी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देण्यात येत होता. आता मात्र, त्याउलट म्हणजे दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ दिला जाणार आहे. रेशन धान्य उशिरा मिळाल्याच्या तक्रारी वाढतात; पण आता थेट धान्यच कमी केल्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...