आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार सोहळा:कासोद्याच्या विकास कामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर : पालकमंत्री गुलाबराव पाटील

कासोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नदीचा कितीही विस्तार झाला तरी ती उगम विसरत नाही. यामुळे राजकीय कारकीर्दीत कितीही पुढे गेलो तरी जेथून सुरूवात झाली, त्या कासोद्याला आपण कधीही अंतर देणार नाही. याच बिर्ला चौकातील अनेक सभांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा दिली. कासोदेकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आणि या प्रेमाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण सातत्याने कामे केली व भविष्यातही करतच राहू, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. या वेळी त्यांनी कासोदा शहराच्या विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून दोन कोटींचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली.

कासोदा येथे सरपंच तथा शिवसेना शहरप्रमुख महेश पांडे आणि उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी यांनी बिर्ला चौकात कृषी रत्न व उच्च शिक्षितांचा सत्कार आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी परिसरातील ५६ प्रगतीशील शेतकरी आणि २३ उच्चशिक्षित गुणवंतांच्या सन्मानासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, हिंमत पाटील, पाचोऱ्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन, बंटी चौधरी, अमोल भोई, दगडू चौधरी, अमोल पहिलवान आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आगमन होताच फटाक्यांची आतषबाजीत पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. वैभव महाजन यांनी पालकमंत्र्यांच्या जीवनावरील भाऊ या कवितेचे वाचन केले, त्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, सोसायटीच्या संचालकांसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सरपंच महेश पांडे यांनी तर उपशहर प्रमुख रवींद्र चौधरी यांनी आभार मानले.

यांचीही व्यक्त केले मनाेगत
प्रास्ताविकात सरपंच महेश पांडे यांनी, भाऊंचे कासोदा येथे जुने ऋणानुबंध असल्याचे सांगून शहरासाठी ११ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे स्पष्ट केले. या योजनेसाठी फिल्टरची मागणी करताच पालकमंत्र्यांनी तत्काळ त्याला मंजुरी दिली. डॉ. हर्षल माने यांनी पालकमंत्र्यांच्या विकासाभिमूख वाटचालीचे कौतुक केले. आमदार किशोर पाटील यांनी भाऊंमुळेच जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा अागामी ३ वर्षात पूर्ण होतील, अशी आशा व्यक्त केली.

प्रेमाने भारावलो : पालकमंत्री ... सत्कारला उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले की, कासोदेकरांच्या प्रेमाने भारावलो आहे. येथूनच माझी सुरूवात झाली असून हे शहर आजही माझ्या हृदयात आहे. या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यासठी मी कटिबद्ध आहे. यापूर्वीच येथे ११ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून फिल्टर ही आता लावले जाईल. जिल्ह्यातील कुणीही व्यक्त तहानलेला राहू नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचमुळे माझी पाणीवाला बाबा म्हणून ओळख होत असून ही आपल्या कामाची पावती असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जनतेच्या प्रेमाची श्रीमंती : आमदार चिमणराव पाटील
आमदार चिमणराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, भाऊंची आजवरची वाटचाल प्रेरणादायी असून भाऊंवर जीवनपट तयार होऊ शकतो. त्यांची स्व-कर्तृत्वाच्या वाटचालीची प्रेरणा नवीन पिढीला आदर्शवत आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात मापदंड प्रस्थापित केला आहे. भेदभाव न करता त्यांनी केलेली कामे पाहता ते यशस्वी पालकमंत्री ठरले आहेत. त्यांना जनतेचे अलोट प्रेम लाभले असून त्यांची ही श्रीमंती कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...