आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत वीर जवान महाजनांवर अंत्यसंस्कार

मुंदाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळा तालुक्यातील तरवाडे खुर्द येथील वीर जवान संतोष बाबुलाल महाजन यांच्यावर ५ नोव्हेंबर रोजी शासकीय इतमामात व शाेकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

वीर जवान संतोष यांचे पार्थिव ४ रोजी चाळीसगाव येथे आणलेे. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यांना तरवाडे येथे आणून तरवाडे येथील गो-शाळेपासून संपूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यांच्या मुलाने पार्थिवास अग्निडाग दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या वेळी सीआरपीएफचे निरीक्षक आर.पी. सिंग, पोलिस उपनिरीक्षक संजू काशीद, एस.संदेश, एस. एम. सूर्यवंशी, राजू भोसले आदी जवान उपस्थित होते. या वेळी १०० फूट तिरंगा ध्वज, प्रत्येक घरासमोर रांगोळी व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. वीर जवान संतोष महाजन हे झारखंड राज्यातील रांची येथे सीआरपीएफच्या २१४ ब्रेव्हो बटालियनमध्ये कार्यरत होते.

बातम्या आणखी आहेत...