आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतदयेचा प्रत्यय:मृत माकडावर तळेगाव येथे अंत्यसंस्कार, दशक्रिया अन् तेरवीचा कार्यक्रमही घेतला; युवकांचा पुढाकार

तळेगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळेगांव/शेळगाव येथे माणुसकीचे दर्शन घडविणारी घटना नुकतिच घडली. अज्ञात ट्रकच्या धडकेने मृत झालेल्या माकडावर गावातील नागरिकांनी अंत्यसंस्कार केले. तसेच तिसऱ्या दिवशी सारी, सातव्या दिवशी दशक्रिया विधी तर तेरवीचाही कार्यक्रम घेतला.

माणुसकी हरवत चाललेल्या सध्याच्या युगात, भूतदयेचा प्रत्यय देणारी ही घटना घडली. त्यामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला आहे. प्रत्येकजण आपल्या धावपळीत व्यस्त असताना, तळेगाव/शेळगाववासियांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. नुकताच या भागात अज्ञात ट्रकने धडक दिल्याने माकडाचा मृत्यू झाला होता. माकडाच्या पार्थिवावर ग्रामस्थांनी अंत्यविधी केले. तसेच अंत्यंस्कारानंतरचे सर्व धार्मिक विधीदेखील पार पाडले. मनोज पाटील, अमोल झटकवळे, रामलाल महाजन, मंगल जिरी, दिलीप भोरकळे, जालिंदर पाटील, भास्कर पाटील, संदीप पाटील, बेलेश्वर नगरातील रहिवाशांनी दशक्रिया विधीत मुंडण केले. तसेच बेलेश्वर नगरातील रहिवाशांनी वर्गणी जमवून २५० जणांसाठी पंगतीचा कार्यक्रम घेतला.

बातम्या आणखी आहेत...