आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कासोद्यात जुगारावर छापा; आठ अटकेत, सव्वा लाखांची रोकड जप्त

कासोदा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बिर्ला चौक परिसरात जुगार अड्ड्यावर २२ रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम जप्त करुन आठ जणांवर गुन्हा दाखल केला.

पोलिस नाईक अमोल पाटील, गणेश नेटके, महेश बागुल, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे विनोद खैरनार व उज्वलकुमार म्हस्के यांनी ही कारवाई केली. चौकात पत्री शेडमध्ये संशयित झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत होते.

बातम्या आणखी आहेत...