आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पणत्या अन् पुशपिनांनी साकारले गणेश; विविध वस्तूंच्या माध्यमातून अनेक स्वरूपातील प्रतिकृती

पाचोरा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून विविध पद्धतीने व आगळ्यावेगळ्या रूपांत पर्यावरण पूरक अशा श्री गणरायाच्या प्रतिकृती साकारण्या आल्या आहेत. सालाबादाप्रमाणे यंदाही शिंदेंनी एक अनोख्या पद्धतीने विविध वस्तूंच्या माध्यमातून अनेक स्वरूपातील प्रतिकृती तयार केल्या आहेत.

अशा विविध आगळ्या वेगळ्या स्वरूपातील श्री गणेशाचे दर्शन तालुक्यातील नागरिकांना होणार असून कलाकारांनी साकारलेल्या या कलेचा आनंद घेता येणार आहे. यासाठी दिवसरात्र मेहनत घेणारे मुख्य कलाकार चेतन राऊत, निरंजन भास्कर शेलार, राहुल चिंतामण पाटील, जितेंद्र काळे, सुबोध कांतायन, संदीप पाटील यांच्यासह सह कलाकार दर्शन सोनवणे, लौकिक अग्रवाल, विशाल सोनवणे, अक्षय पाटील, रितेश वाघ, निशांत पाटील, संकेत पाटील, ओम कानडे, सिद्धार्थ जाधव, रोहित भोई, पवन पाटील, दीपक हटकर, रामेश्वर मोरे, रुपेश सोनार, हर्षल हटकर, पवन पवार, हर्षल कोळी, संदीप लोहार, गौरव पवार, शुभम पाटील, गौरव सोनवणे, अमोल लाथ आदींचे याेगदान आहे.

पणतींचा गणेशा
मातीच्या २५०७५ पणत्यांच्या श्री गणेशाची प्रतिकृती उभारली गेली आहे. या प्रतिकृतीचा आकार ३० फूट लांब व २० फूट रुंद असून ती साकारण्यासाठी सलग ३० तास लागले. त्यासाठी मेहनत घेणारे मुख्य कलाकार ६ व सहकलाकार १७ असे एकूण २२ कलाकारांनी मेहनत घेऊन ही प्रतिकृती साकारलेली आहे.

पुशपिनचा श्रीगणेशा
कार्यालयीन स्टेशनरीत वापरात असलेल्या पुश पिनांपासून तयार केलेल्या या प्रतिकृतीमध्ये एकूण ८५ हजार पुश पिनांचा वापर केला. या प्रतिकृतीचा आकार लांबी ८ फूट व रुंदी ८ फूट असून त्यासाठी सलग ७५ तासांचा कालावधी लागला. या प्रतिकृतीसाठी मुख्य कलाकार ६ व सह कलाकार १७ अशा एकूण २३ कलाकार एकत्र आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...