आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील रांजणगाव शिवारातील शेतातील घराचा कडीकोंडा तोडून, चोरट्यांनी ४९ हजार रूपये किंमतीचा सात क्विंटल कापूस चोरून नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने चोरलेल्या कापसासह १ लाख रूपये किंमतीचे वाहन असा १ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रांजणगाव शिवारात मनोहर माधव पाटे (वाणी)यांच्या शेतात दि.१८ रोजी ही चोरी झाली होती.
गुप्त माहितीवरुन पोलिसांनी संशयित अजय जयवंत पाटील (वय २५), प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण पाटील(वय २१, दोन्ही. रा. रांजणगाव), चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे (वय २५, रा. जुना कोळीवाडा, पिलखोड), शालिक अरुण पाटील, सुरेश उर्फ पप्पू राजेंद्र कोष्टी (वय २६, दोन्ही रा. रांजणगाव) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी कापूस चोरीची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन (एमएच.०४ डीके.४६१०) जप्त केले. संशयित चंद्रकांत उर्फ बंटी गोकूळ मोरे याने चोरलेला कापूस पिलखोड येथील व्यापारी पवन दशरथ महाले याला विकला होता. तसेच कापूस माझ्या मालकीचा आहे, असे सांगून तुमच्याकडे कापूस ठेवा, पैसे नंतर घेऊन जाऊ अशी बतावणी केली .
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.