आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील ढेकूरोड, पिंपळेरोड भागात घंटागाडीची सेवा नियमित असूनही, काही नागरिक रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. त्यामुळे या भागात वराह, मोकाट श्वान आणि डासांचा उपद्रव वाढला आहे. नागरिकांनी कचरा पालिकेच्या घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पिंपळे रस्त्यावरील एलआयसी कॉलनी, ढेकू रस्त्यावरील देशमुखनगर भागात पालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडांवर गाजर गवत, बाभळाची झाडे वाढली आहेत. त्यामुळे सरपटणारे प्राणी आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच रस्त्यालगत टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे, तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.