आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये रविवारी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. तालुकाध्यक्ष निवडीच्या विषयासाठी आयोजित या बैठकीत या वेळी विधान सभेचे उमेदवार म्हणून संजय गरूड यांच्या नेतृत्वावर सर्वांनी मिळून एकमताने शिक्कामोर्तब केले.
गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रवादीच्या जामनेर तालुकाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी निरीक्षक अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जामनेरात बैठक पार पडली. या वेळी पूर्वीची नावे दिलेल्यांव्यतिरिक्त आणखी आठ ते दहा कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या. तालुकाध्यक्ष पदाचा विषय सुटू शकला नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संजय गरूड यांचे नेतृत्व प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, डी. के. पाटील यांनी आपल्या भाषणातून जाहीररीत्या मान्य केले केले. एवढेच नव्हे तर पहूर येथील किरण भास्कर पाटील यांनी डी. के. पाटील व संजय गरूड यांचा हातात हात घालून उंचावत एकसंघ असल्याचे प्रदर्शन केले. या वेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, दगडू पाटील, जिनप्रेसचे संचालक भगवान पाटील आदी हजर हाेते.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निवडीकडे लक्ष
राजेंद्र पाटील यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन निवड झालेली नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निवडीचा विषय प्रलंबित आहे. किशोर पाटील, विलास राजपूत यांच्यासह १२ इच्छुकांनी तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या होत्या. मात्र, आजपर्यंत नेत्यांमध्येच कोणत्याही नावावर एकमत झालेले नाही. त्यामुळे रविवारी पुन्हा बैठक घेऊन नव्याने काही इच्छुकांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे आतातरी तालुकाध्यक्ष निवडीचा विषय मार्गी लागेल किंवा नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.