आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगाव:मजुराच्या घरात गॅसचा स्फोट, लाख रुपयांसह साहित्य खाक, बैल विकून आलेली रक्कम आगीत जळाली

चाळीसगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उसतोड करून नुकतेच गावी परतलेल्या सांगवी येथील ऊसतोड मजुराचे घर सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. यात बैलविक्रीतून त्याला मिळालेले एक लाख रुपये तसेच धान्य व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले असून मजुराचा संसार उघड्यावर पडला आहे.

सांगवी येथील ऊसतोड मजूर दामू फंदू राठोड हे तीन-चार दिवसंापूर्वी साखर कारखान्यात ऊसतोड करून कुटुंबासह गावी परतले होते. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी घरात स्वयंपाक करत असताना अचानक गॅस सिलिंडर लीक झाला व स्फोट होऊन आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले. घरातील संसारोपयोगी वस्तूंसह, ५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १० पोते बाजरी, बैलांची विक्री करून आणलेले कपाटात ठेवलेले १ लाख रुपये असा ऐवज जळून खाक झाला. आगीमुळे शेजारील धनंजय ठाकरे यांच्या घराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

एकूण ३ लाखांचे नुकसान
आगीत एकूण ३ लाख रुपयांचे नुकसान झाले. शेजारी नागरिकांनी धाव घेत मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. चाळीसगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाने नंतर आग आटोक्यात आली. तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामा केल्याचे सरपंच महेंद्र राठोड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...