आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे स्वागत:बालाजी शाळेत गीताने विद्यार्थ्यांचे केले स्वागत ; पारोळा तालुक्यात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षक, शिक्षिका.

पारोळा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचालित पूर्व प्राथमिक विद्यालयात अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु. एच. करोडपती तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय पोषण आहार अधीक्षक सी. एम. चौधरी, माजी सभापती डॉ. सुभाष पाटील, सचिव डॉ. सचिन बडगुजर, संचालिका मंगला करोडपती, डॉ. चेतन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, प्राचार्य विजय बडगुजर, स्वाती बलखंडे आदी उपस्थित होते. सी. एम. चौधरी, उमेश करोडपती, डॉ. सचिन बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपशिक्षक सुजीतकुमार कंसारा यांनी स्वरचित “शाळा आमची किती छान’ हे गीत सादर केले. प्रास्ताविक हेमंतकुमार पाटील, सूत्रसंचालन नितीन जाधव तर सुजितकुमार कंसारा यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...