आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ उपविजेता‎:आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धेत‎ मारवड कॉलेजचा मुलींचा संघ उपविजेता‎

पाडळसरे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भडगाव येथे झालेल्या एरंडोल विभाग अंतर‎ महाविद्यालयीन स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. त्यात‎ मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील‎ कला महाविद्यालयातील मुलींचा संघ उपविजेता ठरला.‎ संघात किरण साळुंखे, अश्विनी साळुंखे, दिपिका पाटील,‎ दिपाली पाटील, नेहा भोई, पुनम भिल, कनुश्री पाटील,‎ रुपाली साळुंखे, स्वाती चौधरी, वैष्णवी महाजन, ललिता‎ वडर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

संघासोबत‎ प्रशिक्षक म्हणून क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील, तर‎ संघ व्यवस्थापक सचिन पाटील यांनी काम पाहिले.‎ संस्थाध्यक्ष जयवंतराव पाटील, उपाध्यक्ष देविदास पाटील,‎ संस्थेचे सचिव देविदास पाटील, प्राचार्य डॉ.वसंत देसले‎ यांनी संघाचे कौतुक केले.‎

बातम्या आणखी आहेत...